गवळण मथूरेला निघाली
कशी भूल पडली मला
गवळण मथूरेला निघाली
नेसले पितांबर शालू गं बाई
कृष्णा माझ्यासंगे आता नको बोलू
खेळ होईल तूझा रे, वेळ जाईल माझा
मग राग हवा कशाला
गवळण मथूरेला निघाली
पेंद्या सूदामाची जोडी बरोबरी हो
फोडीती आमूच्या उतरंडी
सासू बोलेल मला रे, शिव्या देईल तूला
मग राग हवा कशाला
गवळण मथूरेला निघाली
अनयातीही मी गवळण राधा, गवळण राधा
विसरून गेले घरकाम धंदा
निळा म्हणे रे श्री हरी, नको वाजवू बासरी
तूझ्या मूरलीने जीव वेडावला
गवळण मथूरेला निघाली