Prarambhi Vinati Karu Ganpati Lyrics In Marathi
प्रारंभी विनंती करू गणपति विद्यादया सागरा ।
अज्ञानत्व हरोनी बुद्धी मती दे आराध्य मोरेश्वरा ||
चिंता क्लेश दरिद्र दु:ख अवघे देशांतरा पाठवी |
हेरंबा गणनायका गजमुखा भक्तां बहु तोषवी || १ ||
मोरया मोरया गोड हे नाम तुझे |
कृपा सागरा हेची माहेर माझे ||
तुझी सोंड बा वाकुडी एकदंता |
मला बुद्धी दे मोरया गुणवंता || २ ||
गणपती म्हणे वेरण्या दुष्टाच्या संगती न लागावे |
ज्याला मोक्षपदाची इच्छा, त्याने सदा मला गावे || ३ ||
देवा परमसमर्था दिनदयाला प्रभो जगन्नाथा |
आलो शरण तुला मी, दिन तुझ्या ठेवितो पदी माथा || ४ ||
देवा तव सेवेचा सदिछेचा असो मला छंद |
कि साधू संगतीचा ह्यांतच वाटो मनास आनंद || ५ ||
तू सागर करुणेचा देवा तुजलाच दु:ख सांगावे |
तुज वाचुनी इतरांशी दिनमुख पसरोन काय मागावे || ६ ||